Shreya Maskar
न्यू इयर पार्टीला मुलांसाठी झटपट अंड्याशिवाय कपकेक बनवा.
कपकेक बनवण्यासाठी मैदा, पिठीसाखर, कोको पावडर, बेकिंग पावडर, सोडा, लोणी, कंडेन्स मिल्क इत्यादी साहित्य लागते.
कपकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये मैदा, पिठी साखर, कोको पावडर आणि बटर घालून एकत्र करा.
त्यानंतर या मिश्रणात बेकिंग पावडर, कंडेन्स मिल्क आणि सोडा टाकून एकजीव करून घ्या.
आता हे मिश्रण तुमच्या आवडत्या कपमध्ये टाका.
५ मिनिटे कपकेक मायक्रोवेव्हमध्ये बेक करून घ्या.
आता या कपकेकवर चॉकलेट सिरप घालून याचा अस्वाद घ्या.
कपकेकची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता.