Pear: बाजारातून गोड आणि रसाळ पेर निवडायचंय? खरेदी करताना हे ४ उपाय लक्षात ठेवा

Shruti Vilas Kadam

पेर खूप कडक नसावा

फळ हातात घेऊन हलकेच दाबून पाहा. थोडे नरम आणि हलके दाबले जाणारे पेर खाण्यासाठी तयार असतात. खूप कडक फळ कच्चे असू शकते.

Pear

फक्त रंग पाहून फळ खरेदी करू नका

पेरचा रंग पाहून त्याची गोडी ठरवता येत नाही. रंगासोबत फळाची नरमपणा आणि साल व्यवस्थित तपासणे आवश्यक आहे.

Pear

साल आणि डाग तपासा

फळ चारही बाजूंनी पाहा. काळे किंवा तपकिरी डाग, कट, दबलेले भाग किंवा सडलेला भाग दिसत असल्यास असे फळ घेणे टाळा.

पेरचा सुगंध तपासा

पिकलेल्या बाबूगोशाला हलका गोड सुगंध येतो. मात्र केवळ सुगंधावरून फळ निवडू नका; त्यासोबत फळ नरम आहे का आणि सालही तपासा.

Pear

लगेच खायचा असल्यास हलका नरम बाबूगोशा निवडा

जर फळ लगेच खायचे असेल तर हलका नरम पेर निवडू शकता. एक-दोन दिवसांनी खायचा असल्यास तुलनेने थोडा कडक फल निवडणे योग्य ठरते.

Pears | pinterest

कच्चा पेर कसा पिकवायचा?

पेर कच्चा असेल तर तो काही काळ खोलीच्या तापमानावर ठेवता येतो. त्याला थेट उन्हात ठेवण्याची गरज नाही.

pear fruit | yandex

घरी आणल्यानंतर योग्य पद्धतीने ठेवा

पेर सहज मऊ होऊ शकतो. त्यामुळे तो जड वस्तूंच्या खाली ठेवू नका. आधीच नरम झालेला पेर आधी खा आणि बाकी फळे कोरड्या, स्वच्छ ठिकाणी ठेवा.

Pear | Canva

Skin Care: टॅनिंग आणि पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी घरीच तयार करा व्हिटॅमिन C फेस मास्क; मिळेल ग्लोईंग स्किन

Skin Care
येथे क्लिक करा