Shruti Vilas Kadam
व्हिटॅमिन C हे अँटिऑक्सिडंट असून त्वचेची निगा राखण्यासाठी त्याचा वापर केला जातो. यामुळे त्वचा अधिक फ्रेश आणि उजळ दिसण्यास मदत होऊ शकते.
सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर टॅनिंग होऊ शकते. व्हिटॅमिन C असलेल्या घटकांचा वापर त्वचेचा असमान टोन कमी करण्यासाठी मदत करू शकतो.
व्हिटॅमिन C आधारित फेस मास्कचा वापर केल्याने त्वचा अधिक ग्लोइंग आणि फ्रेश दिसू शकते. मात्र प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असल्याने परिणामही वेगवेगळे असू शकतात.
व्हिटॅमिन C असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून घरच्या घरी फेस मास्क तयार करता येतो. घटकांचे प्रमाण योग्य ठेवणे आणि ताजे मिश्रण वापरणे महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन C त्वचेतील मेलॅनिन निर्मितीशी संबंधित प्रक्रियेवर परिणाम करू शकते. त्यामुळे पिग्मेंटेशन किंवा डागांच्या काळजीसाठी त्याचा वापर केला जातो.
घरगुती फेस मास्क जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवणे टाळा. त्वचेला जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास त्वरित चेहरा स्वच्छ धुवा.
नवीन फेस मास्क वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. संवेदनशील त्वचा असल्यास किंवा त्वचेचा त्रास असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.