Shreya Maskar
शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे, गूळ, तूप, ड्रायफ्रूट्स आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे स्वच्छ धुवून खरपूस भाजून घ्या.
शेंगदाण्याची साले काढून त्याचा कूट तयार करा.
भाजलेल्या शेंगदाण्यांच्या कूटामध्ये किसलेला गूळ घाला.
या मिश्रणात ड्रायफ्रूट्सचे काप देखील टाकू शकता.
शेवटी या मिश्रणात एक चमचा तूप मिक्स करा.
मिश्रण गरम असतानाच त्याचे छोटे-छोटे लाडू वळा.
लाडू वळताना हाताला चिकटू नये म्हणून तूप लावा. म्हणजे पटापट लाडू वळून होतील.