Shreya Maskar
रोजच्या छोट्या भुकेसाठी शेंगदाणा चिक्की बनवा.
शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी शेंगदाणे, गूळ, वेलची पावडर , ड्रायफ्रूट पावडर आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या.
शेंगदाणे भाजून झाल्यानंतर साल काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गूळ वितळवून घ्या.
गुळाचा पाक तयार झाल्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, ड्रायफ्रूट पावडर आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
एका ताटाला तूप लावून त्यावर मिश्रण छान पसरून घ्या.
चिक्की फ्रिजमध्ये सेट करायला ठेवून द्या.