Shreya Maskar
कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी कढीपत्ता, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, मीठ, तेल आणि लिंबू इत्यादी साहित्य लागते.
कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्या.
मिक्सरमध्ये प्रथम हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे वाटून घ्या.
त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि कढीपत्ता वाटा.
एका बाऊलमध्ये हे सर्व टाकून त्यात चवीनुसार मीठ आणि तेल मिक्स करा.
शेवटी यात लिंबू पिळून घाला.
गरमागरम चपातीसोबत कढीपत्त्याची चटणीचा आस्वाद घ्या.
कढीपत्त्याची चटणीमुळे पचन सुधारते आणि त्वचा चांगली राहते.