Shreya Maskar
चवळीची आमटी बनवण्यासाठी चवळी, मूग -तूर डाळ, टोमॅटो, लसूण, कांदा, तेल आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
चवळीची आमटी बनवण्यासाठी मीठ, हळद, लाल मसाला, गरम मसाला, जिरे, धणे इत्यादी मसाले लागतात.
चवळीची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम चवळी आणि डाळ स्वच्छ धुवून भिजवून घ्या.
डाळ आणि चवळी कुकरमध्ये चांगली शिजवून घ्या.
मिक्सरमध्ये लसूण, कांदा, टोमॅटो आणि मसाले वाटून घ्या.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाले छान परतून घ्या.
यात शिजवलेली डाळ आणि चवळी मिक्स करा.
गरजेनुसार पाणी आणि मीठ टाकून आमटी उकळायला ठेवा.