Leftover Chapati : उरलेल्या चपात्यांपासून अवघ्या १० मिनिटांत बनवा कुरकुरीत नाश्ता, सर्वजण आवडीने खातील

Shreya Maskar

उरलेल्या चपात्यांपासून बाकरवडी

उरलेल्या चपात्यांपासून बाकरवडी बनवण्यासाठी उरलेल्या चपात्या, बेसन, पाणी, चिंच – गुळाची चटणी , तेल आणि पांढरे तीळ इत्यादी साहित्य लागते.

Bhakarwadi from leftover chapatis | yandex

मसाले

उरलेल्या चपात्यांपासून बाकरवडी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, हळद, मीठ, लाल मसाला, गरम मसाला आणि कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

हिरवी मिरची पेस्ट

उरलेल्या चपात्यांपासून बाकरवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरला हिरव्या मिरच्या, आलं, लसूण यांची पेस्ट तयार करा.

Green chilli paste | yandex

बेसन

एका बाऊलमध्ये बेसन, पाणी, हळद, चवीनुसार मीठ, लाल मसाला, गरम मसाला, लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.

Besan | yandex

चिंच -गुळाची चटणी

आता उरलेल्या चपात्यांवर चिंच -गुळाची चटणी व्यवस्थित लावून घ्या.

Tamarind-jaggery chutney | yandex

पांढरे तीळ

त्यावर बेसनाची तयार केलेली पेस्ट पसरवून पांढरे तीळ टाका.

White sesame seeds | yandex

रोल करा

त्यानंतर चपातीला गोलाकार आकारात रोल करून त्याचे तुकडे करा.

Roll | yandex

तेलात तळा

गरम तेलात तयार बाकरवडी खरपूस तळून घ्या.

Fry in oil | yandex

NEXT : कोकण स्पेशल फणसाची पोळी, तोंडात टाकताच विरघळेल

Jackfruit Poli Recipe | yandex
येथे क्लिक करा