Sakshi Sunil Jadhav
भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा आहे. हा सौंदर्य, अभिमान आणि संस्कृतीचं प्रतीक मानला जातो. त्याच्या रंगीबेरंगी पिसांमुळे आणि नृत्यामुळे तो सगळ्यांचा लाडका पक्षी आहे.
तुम्हाला माहिती आहे का, हा सुंदर पक्षी नेमका किती वर्षे जगतो? याचं उत्तर जाणून तुम्ही थक्क व्हाल.
अनेकांना माहित नसेल की, मोराचे Pavo Cristatus असे वैज्ञानिक नाव आहे. बऱ्याचदा ही माहिती वगळली जाते.
मोर साधारणतः 20 ते 25 वर्षांपर्यंत जगू शकतो. हे पूर्णत: त्याच्या खाण्यापिण्यावर आणि निसर्गावर अवलंबून असते.
मोर हा भारतातील जंगल, शेतीजवळील प्रदेश आणि पावसाळी भागात आढळतो. या पैकी काही जंगली मोर सुद्धा आहेत. १५ ते २० वर्षे हे मोर जिवंत राहतात.
मोर धान्य, कीटक, साप, छोटे प्राणी आणि फळं खातो. हा मोराचा आवडता आहार आहे.
मोराच्या शेपटीत सुमारे 150 ते 200 रंगीबेरंगी पिसं असतात. ही लोक बाजारात मोठ्या प्रमाणात विकतात.
मादी मोर (मोरनी) दर वेळी 4 ते 8 अंडी घालते. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार, मोराला मारणे किंवा त्याचे पिसं विकणे कायद्याने गुन्हा आहे.