Manasvi Choudhary
साडी नेसल्यावर प्रत्येक महिला सुंदर दिसते. मराठमोळ्या ते स्टायलिश लूकसाठी अनेक डिझाईन्सच्या साड्या असतात.
एखाद्या पार्टीत किंवा कार्यक्रमात हॉट, बोल्ड आणि मॉडर्न दिसायचे असेल, तर तुम्ही साध्या साडीपेक्षा काही हटके पॅटर्न ट्राय करायला हवेत.
आजकाल शिमर आणि सिक्विन साडीचा ट्रेंड सुरू आहे. साडीवर चकाकणारी डिझाईन असलेला हा पॅटर्न तुम्ही देखील निवडू शकता. नाईट पार्टीसाठी हा बेस्ट पॅटर्न आहे.
सॅटिन साडी तिच्या मऊ आणि चमकणाऱ्या कापडामुळे ओळखली जाते ही साडी तुम्ही डिझायनर म्हणून घालू शकता यावर तुम्ही बेल्ट देखील लावू शकता.
साडीच्या काठाला आणि पदराला असलेल्या रफल लेअर्स असल्याने हा स्टायलिश लूक दिसतो. यावर 'ऑफ-शोल्डर' किंवा 'हॉल्टर नेक' ब्लाउज खूप स्टायलिश दिसतो.
एकदम साधी शिफॉन साडी आणि त्यासोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा 'ब्रालेट' स्टाईल ब्लाउज तुम्ही निवडू शकता.
नेटच्या साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात, पण आता त्यात बारीक लेस आणि फ्लोरल पॅचवर्कचा ट्रेंड आहे. या साडीसोबत 'कोर्सेट' स्टाईल ब्लाउज ट्राय करा.