Manasvi Choudhary
मुलांच्या संगोपनात घरातील वातावरण महत्वाचे असते. लहान मुले ही आपल्या पालकांच्या वागणुकीचे निरीक्षण करतात.
जर तुमच्याही घरात वारंवारं भांडणे होत असतील तर त्याचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक मनावर परिणाम होतो.
यामुळे लहान मुलांच्या समोर आई- वडिलांनी कधीही वाद घालू नये, मतभेद करू नये.
जेव्हा मुले आई- वडिलांना भांडताना किंवा मोठ्याने वाद घालताना पाहतात तेव्हा ती घाबरतात त्यांना असुरक्षित वाटू शकते.
घरातील ताणतणावाचा परिणाम मुलांच्या वागणूकीत दिसून येतो. मुलेही शांत होतात तर काही मुले हट्टी होतात.
अभ्यासात मन लागत नाही, मित्र मैत्रिणीपासून दूर राहतात, एकटे एकटे राहतात, क्षुल्लक कारणांवरू राग येतो किंवा रडतात असे परिणाम दिसतात.
ज्या घरामध्ये आई- वडिलांची सतत भांडणे सुरू असतात तेव्हा मुले सहसा व्यक्त होत नाही. कोणतीही गोष्ट सांगत नाही. मुलांना कोणतीही अडचण,त्रास असला तर ते आई- वडिलांना सांगत नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.