Shreya Maskar
आजकाल मुलांना शाळेत घालताच त्यांना दुसऱ्या बाजूला ट्यूशन लावतात. मात्र लहान वयातच क्लासला जाणे मुलांच्या विकासासाठी घातक ठरते. एका लहानपणापासून मुलांना स्वतःचा अभ्यास स्वतः करायची सवय लावा.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा मुलाला एकाच कामासाठी शाळा, घर आणि (शिकवणी/ क्लास/ ट्यूशन) अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून सूचना मिळतात, तेव्हा त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यांना नेमके काय करावे हे समजत नाही.
शाळेत असताना मुलाला वाटते की ते घरी अभ्यास करतील, तर घरी असताना त्यांना वाटते की ते क्लासमध्ये शिकतील. अशा प्रकारे अभ्यासाची जबाबदारी वारंवार पुढे ढकलली जाते. ज्यामुळे अभ्यास होत नाही आणि मुलाला काम पुढे ढकलण्याची सवय लागते.
क्लासमुळे मुल प्रत्येक गोष्टीसाठी कोणावर तरी अवलंबून राहू लागतात. तेव्हा त्यांच्यात स्वतःहून गोष्टी करण्याची जबाबदारी विकसित होत नाही. ते स्वतःचे मत विसरून जातात.
पालकांची कायम तक्रार असते की, त्यांची मुल जबाबदार बनत नाही, पण यामागे अनेकदा आपल्या स्वतःच्या सवयी कारणीभूत असतात. लहानपणापासून मुलांना जबाबदारी द्या. त्यांना स्वतःचा अभ्यास करू द्या. दोन गोष्टी स्वतः शिकू द्या.
मुलाला शिकवणीला पाठवण्याचा सर्वात मोठा वाईट परिणाम म्हणजे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. जेव्हा मुलाला स्वतःहून अभ्यास करण्याची सवय लागत नाही, तेव्हा त्यांना आपल्या क्षमतांची पारख होत नाही. ते क्लासवर अवलंबून राहतात. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.
मुलांच्या मानसिक विकासावर वाईट परिणाम होतो. सतत इतरांवर अवलंबून राहणे हे मुलाच्या मानसिक जडणघडणीचा एक भाग बनू शकते.
जेव्हा मुलाला प्रत्येक समस्येवर दुसऱ्यांकडून उपाय शोधण्याची सवय लागते. तेव्हा त्याचा मेंदू स्वतःहून उपाय शोधण्यास बंद होतो. या सवयीचा परिणाम भविष्यात त्यांच्या अभ्यासावर आणि आयुष्यातील निर्णयांवर होऊ शकतो.