Manasvi Choudhary
पालकांना लहान मुलांच्या आहाराची योग्य ती काळजी घ्यावी लागते.
मुल सहा महिन्याचे होईपर्यंत त्याला आईचे दूध दिले जाते.
सहा महिन्यानंतर मुलांना तांदळाचे पाणी, पेज, मसूर पाणी यासारखे हलके पदार्थ खायला दिले जातात.
लहान मुलांची पचनशक्ती कमजोर असल्याने त्यांच्या आहाराची योग्य काळजी घेतली जाते.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते व अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
लहान मुलांच्या आहारात मिठाचे प्रमाण जास्त असले तर किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
लहान मुलांना जास्त प्रमाणात मीठ खाण्यास दिले तर उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते व शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते.