Shraddha Thik
अनेक मुलं इतकी खोडकर असतात की त्यांना सांभाळणं कठीण होऊन बसतं. अनेक वेळा पालक आपल्या मुलांच्या खोडसाळपणामुळे खूप अस्वस्थ होतात.
मुले नेहमी इकडे-तिकडे घरात खेळणी पसरवून ठेवतात, तसेच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करू लागतात.
अशा स्थितीत पालकांना तणाव आणि संताप वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी तुम्ही चिडचिड न करता शांत कसे राहाल ते जाणून घ्या...
अनेक वेळा विश्रांती न मिळाल्याने तणाव सुरू होते. त्यामुळे मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ लागतो आणि चिडचिड होऊ लागते. अशा वेळी आराम करा.
तुमचा राग मुलावर काढण्याचे काय परिणाम होतात याचा तुम्ही एकदा नक्कीच विचार केला पाहिजे. कारण मुलं पालकांना पाहून शिकतात.
मुलांमुळे आलेला ताण हा पुरेशी झोप घेतल्यानेही जाऊ शकतो. तसेच आहाराची काळजी घ्या, फिरायला जा आणि स्वतःचीही काळजी घ्या.
तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक अवलंबा.