Parenting Tips : पालकांनो मुलांसोबत करा 'या' ५ गोष्टी, उन्हाळ्याची सुट्टी बनवा मजेदार

Shreya Maskar

उन्हाळी सुट्टी

मे महिना आला आहे. तुमच्या मुलांना उन्हाळ्याची मोठी सुट्टी पडली. ही सुट्टी वाया घालवण्यापेक्षा तुमच्या मुलांना अशा काही गोष्टी शिकवा, जेणे त्यांचे मनोरंजन होईल आणि नवीन गोष्टी देखील शिकतील.

Summer Vacation | pinterest

नवीन कला शिका

तुमच्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त नवीन कला शिकण्यासाठी प्रोत्साहित करा. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना गाणे, वाद्य वाजवणे नृत्य आणि चित्रकला यांसारख्या कला शिकवा.

Learn a New Art Form | pinterest

घरगुती खेळ

मे महिन्यात बाहेर ऊन जास्त असते. त्यामुळे तुम्ही घरीच मुलांसोबत गेम खेळा. घरातील खेळांमध्ये बुद्धिबळ, कॅरम आणि साप सीडी हे येतात. यातून मुलांना खूप मजा येईल.

Indoor Games | pinterest

आवडते खेळ

मुलांच्या आवडीचे खेळ खेळा. मैदानी खेळ संध्याकाळी खेळा. उदा बॅडमिंटन, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल यामुळे मुलं आनंदी राहतील.

Favorite Sports | pinterest

भाषा शिकवा

सुट्ट्यांमध्ये मुलांना एक नवीन भाषा शिकवा. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसोबत नवीन भाषा माहित असणे खूप गरजेचे आहे. पालकांनो अशी नवीन भाषा निवडी जी तुम्हालाही शिकायची आहे.

New Language | pinterest

व्यायामाची सवय

लहानपणापासूनच मुलांना व्यायामाची सवय लावा. सुट्टीत सकाळी योगा, दोरी उड्या आणि पायऱ्या चढणे यांसारख्या ॲक्टिव्हिटीज करा. यामुळे तुम्ही तंदुरुस्त, निरोगी राहाल.

Teach a New Language | pinterest

कामाची सवय

लहान मुलांना याच वयात स्वतःची कामे करण्याची सवय लावा. तसेच वेळ पडल्यास ते दुसऱ्यांना कसे सांभाळून घेऊ शकतील ते शिकवा. उदा, स्वतःच्या जेवणाची भांडी घासणे, कपडे घडी करणे, स्वतःचे कपाट आवरणे

Habit of Exercise | pinterest

डिजिटल ज्ञान

आजकाल सर्व गोष्टी डिजिटली होतात. त्यामुळे मुलांना योग्य वेळेत योग्य डिजिटल ज्ञान देणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात त्यांना कोणतीही समस्या होणार नाही.

Habit | pinterest

NEXT : मुलांना 'ट्यूशन'ला पाठवताय? मग थांबा! लागतील 'या' वाईट सवयी अन् करिअर...

Parenting Tips | yandex
येथे क्लिक करा...