Parenting Tips : पालकांसाठी धोक्याची घंटा! मुलाला उशिरा झोपवताय? शरीरात होतात 'हे' ५ गंभीर बदल

Shreya Maskar

मेंदूचे आरोग्य

झोपेच्या कमतरतेमुळे मुलाची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता कमी होते. ज्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर आणि सर्वांगीण विकास होतो.

Brain Health | pinterest

नैराश्य येतो

उशिरा झोपणारी मुले क्षुल्लक गोष्टींवरून रागावायला आणि रडायला लागतात. छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांना नैराश्य येते.

Depression | pinterest

लठ्ठपणा

झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोन्स विस्कळीत होतात आणि त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. तसेच लठ्ठपणा येतो. लहान मुलांचे वजन जास्त असल्यास त्यांच्या इतर अवयवांवर ताण येतो.

Obesity | pinterest

अशक्तपणा येतो.

झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे मुल अधिक आजारी पडण्याची शक्यता वाढते. मुलांनी जर नीट ८ तासांनी झोप घेतली तर त्यांना दिवसभर उत्साही वाटते.

Weakness | pinterest

वाढ खुंटते

गाढ झोपेमुळे ग्रोथ हार्मोन स्रवतो; नियमितपणे रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने योग्य शारीरिक विकासात अडथळा येतो.

Stunted Growth | pinterest

दीर्घकालीन आजार

सततच्या झोपेच्या कमतरतेमुळे कालांतराने रक्तदाब आणि चयापचय संतुलनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Illnesses | pinterest

मूड स्विंग

पुरेशी विश्रांती न मिळाल्याने मुले चिडचिडी, भावनिक होतात आणि त्यांना लवकर राग येतो. तसेच दिवसेंदिवस त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते.

Mood Swings | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Parenting Tips | saam tv
येथे क्लिक करा...