ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता असते.
परंतु, पालकांच्या काही चुकांमुळे मुलं त्यांच्यापासून दूर जातात.
काही पालक आपल्या मुलांना वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवतो.
अनेकदा पालक आपल्या मुलांचे ऐकत नाही. आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी नाकारतात.
पालक आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतात. यामुळे त्यांचे मन दुखावले जाते.
मुलांवर कोणत्याही गोष्टी करण्यासाठी दबाव आणू नये.
गरजेपेक्षा जास्त लाड केल्याने देखील मुल आई-वडिलांपासून दूर जातात.