ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
खराब जीवनशैली आणि जास्त वेळ स्क्रीन समोर बसल्यामुळे अनेकांना चष्मा लागतो.
बरेच लोक चष्मा घालताना अनेक गोष्टींची काळजी घेत नाहीत.
आज, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, चष्मा घालताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
आपण दुसऱ्याचा चष्मा किंवा चुकीच्या नंबरचा चष्मा घालणे टाळले पाहिजे कारण यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
६ महिन्यांनी तुमचे डोळे तपासा. यामुळे तुम्हाला चष्म्याचा नंबर वाढला आहे की नाही हे समजेल.
घाणेरडे चष्मे वापरल्याने तुमच्या डोळ्यांत वेदना किंवा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत राहावा.