ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात दूषित पाणी आणि तेलकट अन्न यामुळे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच या आजारांचे दुष्परिणाम लिव्हरवर होतात.
लिव्हर शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. आणि शरीराला निरोगी ठेवण्याचे काम करते.
जेव्हा लिव्हर खराब होतो, तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या उद्धभवू शकते. याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो.
या घरगुती उपायांनी लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
दररोज ही दोन पान खाल्ल्याने लिव्हरला हेल्दी ठेवू शकतो, जाणून घ्या.
तुळस आणि पुदिनाचे पान चावून खाल्ल्याने लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
एका ग्लास पाण्यात ५ ते १० तुळशीची पाने आणि २० ते २५ पुदीनाची पाने घालून मिक्स करा. यामध्ये एक हिरवे सफरचंदाचे बारीक तुकडे करुन मिक्स करा आणि प्या.