Manasvi Choudhary
शरीरातील रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा घरगुती उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो.
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पपईच्या पानांमध्ये 'पॅपेन' आणि 'चायमॉपॅपेन' नावाचे घटक असतात, जे शरीरातील रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढवण्यास मदत करतात.
पपईच्या पानांच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ‘सी’ असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
पपईच्या पानांमधील औषधी गुणधर्म पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. तुम्हाला जर पोटामध्ये जळजळ आणि अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही पपईच्या पानांचा रस प्या.
पपईची पाने मिक्सरमध्ये बारीक करून त्यांचा रस गाळून काढा.
पपईच्या पानांचा रस योग्य प्रमाणात प्या. १ ते २ चमचे हा रस कोमट पाण्यात रस मिक्स करून प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.