Shruti Vilas Kadam
पपईमध्ये कॅलरीज कमी आणि व्हिटॅमिन A, C, E तसेच अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी करतानाही शरीराला आवश्यक पोषण मिळते.
पपईमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि जास्त खाण्याची सवय कमी होण्यास मदत होते.
पपईतील पपेन (Papain) हे एन्झाइम अन्नाचे पचन सुलभ करते. पचन चांगले झाल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते.
पपईतील पोषक घटक शरीराचा मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे शरीर अधिक कार्यक्षमतेने कॅलरी बर्न करू शकते.
पपईमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच अतिरिक्त पाणी साचण्याची समस्या कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
नैसर्गिक गोडवा असल्यामुळे पपई खाल्ल्याने मिठाई किंवा साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी टाळता येतात.
पपई नियमित खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते. आतड्यांचे आरोग्य सुधारल्याने वजन कमी करण्याचा प्रवास अधिक प्रभावी ठरू शकतो.