Shreya Maskar
पपईची चटणी बनवण्यासाठी कच्ची पपई, तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, गूळ, लिंबाचा रस, मीठ आणि लाल तिखट इत्यादी साहित्य लागते.
पपईची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पपई किसून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून तडका बनवा.
त्यानंतर मिश्रणात हिरवी मिरची आणि शेंगदाणे घालून थोडे परतून घ्या.
मिश्रण परतल्यावर यात किसलेली पपई, गूळ, मीठ आणि लाल तिखट घालून चांगले एकजीव करा.
आता पपई मध्यम आचेवर मऊ होईपर्यंत शिजवा.
शेवटी चटणीत लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
पपईच्या चटणीची चव वाढवण्यासाठी यात जिरे आणि धणे पूड मिक्स करा.