Manasvi Choudhary
बऱ्याच घरात जेवणात चवीला पापड असतात. पूजा, लग्नकार्यात जेवणात तोंडी लावायला पापड वाढतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? पापडची भाजी पण बनते. खान्देशी, विदर्भ भागात पापड भाजी ही रेसिपी अत्यंत प्रसिद्ध आहे.
पापडची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच अत्यंत सोप्या पद्धतीने पापडची भाजी बनवू शकता.
पापड भाजी बनवण्यासाठी उडीद किंवा मूगाच्या डाळीचे पापड, कांदा, टोमॅटो, तेल, मोहरी, जिरे, हिंग, मसाला, मीठ, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.
पापड भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर पॅनवर पापड भाजून घ्या. पापड तळून घेऊ नका यामुळे भाजी खूप तेलकट होईल.
एका प्लेटमध्ये भाजलेल्या पापडचे लहान लहान तुकडे करून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी आणि जिर परतून घ्या नंतर यात हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी द्या नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
नंतर या मिश्रणात टोमॅटो मिक्स करा आणि हळद, मसाला, धना पावजर हे मसाले घाला.
मिश्रणात आता आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करा आणि थोडेसे गूळ देखील घाला आणि भाजीची उकळ घ्या.
या भाजीमध्ये पापडचे बारीक केलेले तुकडे मिक्स करा आणि भाजीला झाकण लावा. भाजी जास्त शिजवू देऊ नका याची काळजी घ्या
अशाप्रकारे चमचमीत पापड भाजी घरच्या घरी तयार होईल. तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी सोबत सर्व्ह करू शकता.