Manasvi Choudhary
ब्रा हा महिलांच्या रोजच्या वापरातला भाग आहे. आजकाल बाजारात विविध स्टायलिश ब्रा उपलब्ध आहेत. महिलांना आरामदायी वाटतील, त्रास होणार नाही अशा शेपच्या ब्रा मिळतात.
मात्र कधी कधी आपल्याला ब्राविषयी माहित नसल्याने आपण कोणतीही ब्रा खरेदी करतो आणि त्याचा शरीराला त्रास होतो.
कारण तुम्ही घालत असलेली ब्रा योग्य शारीरिक मापानुसार चांगल्या ब्रँडची असणे आवश्यक आहे. यानुसार तुमच्या शरीराच्या साईजनुसार तुम्ही कोणती आणि कशी ब्रा वापरावी हे जाणून घेऊया.
पॅडेड ब्रा ही गुळगुळीत , मोल्डेड कप असते. पॅडेड ब्रामध्ये तुम्हाला 2MM पॅडिंगसह येतात जे अति- पातळ असतात.
नॉन पॅडेड ब्रा कपमध्ये अतिरिक्त पॅडिंग येत नाही. जे कप फॅब्रिकला जोडून असतात.
स्पोर्ट्स ब्रा आरामदायी असते. स्पोर्ट्स ब्रा घातल्याने त्वचेवर कोणती व्रण उठत नाही. व्यायाम करताना तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालू शकता. तुम्ही जर जिमला जात असताल तर स्पोर्ट्स ब्रा वापरणे फायद्याचे राहील.
वायर्ड ब्रामध्ये मेटल अंडरवाय असते जी फॅब्रिकमध्ये शिवून येते जी स्तनांना आधार आणि आकार देते.
नॉन वायर्ड ब्रा कपमध्ये मेटल अंडरवायर नसते यामुळे ही ब्रा अधिक लवचिक असते ही ब्रा तुम्ही कोणत्याही ड्रेसवर सहज घालू शकता.
पूर्ण कव्हरेज ब्रामध्ये स्तनाच्या वरच्या भागाला अधिक कव्हरेज मिळते ही ब्रा कम्फर्टेबल असते. फिटींगच्या कपड्यामध्ये तुम्ही फुल कव्हरेज ब्रा घालू शकता.
टी शर्ट ब्रा ही प्रत्येक स्त्रीकडे असते कोणत्याही कुर्ती- टीशर्टच्या आतमध्ये ही ब्रा घालावी.
स्ट्रॅपलेस ही एक स्टायलिश ब्रा आहे. नावाप्रमाणेच या ब्रामध्ये स्ट्रॅप म्हणजेच खांद्याला पट्ट्या नसतात. ऑफशोल्डर किंवा हॉल्टर नेक टॉपवर तुम्ही ही ब्रा वेयर करू शकता.