Shreya Maskar
रायगड जिल्ह्यात, पनवेलजवळ माणिकगड किल्ला वसलेला आहे. हा एक डोंगरावरील किल्ला आहे. तुम्ही येथे पावसाळ्यात ट्रेक प्लान करा.
माणिकगड किल्ला वाशिवली गावाजवळ आहे. हा किल्ला पनवेलपासून सुमारे २७ किमी आणि मुंबईपासून ६० किमी अंतरावर आहे.
माणिकगड किल्ला स्थानिक व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांनी १७०० च्या सुमारास बांधला होता.
समुद्रकिनाऱ्यावरील बंदरांपासून पुणे परिसराकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी माणिकगड किल्ला बांधण्यात आला होता.
माणिकगड किल्ला हा खडकाळ, नैसर्गिकरीत्या सुरक्षित आणि अनियमित आकाराचा डोंगरी किल्ला आहे. याच्या तीन बाजूंना तीव्र उतार असलेले उभे खडक आहेत, ज्यामुळे त्याला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे.
माणिकगड किल्ल्याच्या शिखरावर केवळ दक्षिणेकडूनच पोहोचता येते. हा किल्ला आता बऱ्याच अंशी पडक्या अवस्थेत असून, येथे केवळ एकच प्रवेशद्वार (गणेश दरवाजा) शाबूत आहे.
मुंबईहून ट्रेनने पनवेलला जा. तेथून पुढे रिक्षाने माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव वाशिवली येथे जा. वाशिवलीपासून तुम्ही किल्ल्यापर्यंत ट्रेक करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.