Shreya Maskar
नवी मुंबईतील खारघर हिल्स ट्रेकिंग आणि पावसाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. तुम्ही येथे फॅमिली आणि मित्रमंडळींसोबत वीकेंडला वन डे ट्रिप प्लान करू शकता.
पावसाळ्यात तुम्हाला भन्नाट फोटोशूट करायचे असेल तर खारघर हिल्सला नक्की भेट द्या. येथे सायकलिंगचा देखील आनंद घेता येतो.
खारघर हिल्स हे २०० मीटर उंच आणि हिरवेगार पठार आहे. पावसाळ्यात येथे पांढऱ्या शुभ्र धबधब्यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. संध्याकाळी येथे पक्षीनिरीक्षणासाठी गर्दी पाहायला मिळते.
१०९ मीटर उंच पांडवकडा धबधबा जो खडकाळ दरीत कोसळतो. खारघर हिल पठाराजवळ स्थित असलेला हा धबधबा पावसाळ्यात अतिशय सुंदर दिसतो.
खारघर हिल्सजवळ सेंट्रल पार्क आहे. जिथे बोटॅनिकल गार्डन, जॉगिंग ट्रॅक आणि ओपन-एअर थिएटर्स आहेत. जवळच शांत आणि सुंदर ओवे धरण देखील आहे.
पावसाळा आणि हिवाळा खारघर हिल्सला भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे. तुम्ही येथे दुपारी किंवा संध्याकाळी फिरायला जा.
खारघर हिल्सला जाण्यासाठी खारघरपर्यंत ट्रेनने प्रवास करा. खारघर स्टेशनपासून रिक्षाने तुम्ही खारघर हिल्सच्या पायथ्याशी असलेल्या गावी म्हणजेच फणसवाडीपर्यंत जा. तेथून छोटा ट्रेक करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.