Shreya Maskar
करंजाडे हिल व्ह्यू पॉइंट हे पनवेल नवी मुंबई येथील निसर्गरम्य ठिकाण आहे. नवी मुंबई येथील JNPT रस्त्याजवळ हे ठिकाण आहे. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
छोटा ट्रेकिंगचा येथे आनंद घेता येतो. तसेच 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या परिसराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. तुम्ही येथे सुंदर निसर्गाचे सौंदर्य कॅमेरात कैद करू शकता.
पहाटे आणि संध्याकाळी येथे फेरफटका मारायला नक्की जा. तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. विशेषतः पावसाळ्यात येथील हिरवळ अत्यंत नयनरम्य असते.
करंजाडे हिल व्ह्यू पॉइंटजवळ बल्लाळेश्वर तलाव आहे. तलावाकाठी बसून तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. येथील स्थानिक लोकांसाठी हे विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण आहे.
करंजाडे हिल व्ह्यू पॉइंटजवळ प्रबळगड किल्ला, कलावंतीण सुळका ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत. ही दोन्ही ठिकाणे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत.
करंजाडे हिल व्ह्यू पॉइंटजवळ कर्नाळा पक्षी अभयारण्य देखील आहे. येथे तुम्हाला विविध प्राणी आणि पक्षी जवळून पाहता येईल.
वीकेंडला पनवेल येथे ट्रिप प्लान करा. येथे निसर्गाच्या सानिध्यात हरवलेली अनेक पर्यटन स्थळे आहेत. उदा. अडाई धबधबा, झेनित धबधबा, गादेश्वर धरण
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.