ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर हे किल्ले, धबधबे आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.
तुम्ही देखील उन्हाळ्याच्या सुट्टीत वनडे ट्रिपचा प्लान करताय तर पनवेलमधील या ठिकाणांना भेट द्यायला विसरु नका.
पनवेलमधील बल्लाळेश्वर मंदिर हे गणपतीला समर्पित आहे. येथे जाऊन तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटेल.
तुम्ही कर्नाळा पक्षी अभयारण्यला भेट देऊ शकता. तुम्हाला येथे वेगवेगळे पक्षी तसेच सुंदर दृश्यांचा अनुभव घ्यायला मिळेल.
कर्नाळा किल्ल्यावर तुम्ही ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचरचा आनंद घेऊ शकता.
पनवेलमधील सुंदर धबधब्यांमध्ये अदाई धबधब्याचा समावेश होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत किंवा कुटुंबासोबत येथे नक्की जा. येथील सुंदर दृश्ये तुमची वनडे पिकनिक अविस्मरणीय करतील.
सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी येथे जा. सूर्योदय आणि सूर्यास्तचे अद्भुत नजारा तुमचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय करतील.