Saam Tv
पनीर सगळ्यांच्या शरीरासाठी खूप महत्वाचे आणि पौष्टिक असते.
पुढे आपण घरच्या घरी पनीर पासून तयार होणाऱ्या स्ट्रीट स्टाईल फेमस पदार्थांची यादी पाहणार आहोत.
पनीर चिली ही घरच्या घरी आणि विविध भाज्यांच्या वापराने तयार करता येते.
पनीर चिली जेवणासाठी एक उत्तम आणि सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी डीश आहे.
किसलेले पनीर, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांपासून पनीर भुर्जी सहज बनत असते.
तुम्ही पनीर भुर्जी चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करू शकता. तसेच पनीर भुर्जी सॅंडवीज हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे.
फक्त १५ मिनिटांत तयार होणारी रेसिपी म्हणजे पनीर पॅन फ्राय आहे.
पनीर पॅन फ्राय रेसिपी तुम्ही अचानक पाहूणे आल्यास झटपट तयार करू शकता.
तुम्ही चपातीमध्ये किंवा फ्रॅंकीच्या विकत मिळणाऱ्या रोलमध्ये पनीरची भाजी आणि इतर सॉस टाकून घरीच फ्रॅंकी तयार करू शकता.