Saam Tv
प्रवास करायला प्रत्येकालाच आवडतो. मात्र त्याचा खर्च करणं सगळ्यांनाच परवडत नाही.
आता चिंता सोडा पुढे आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट ट्रव्हल प्लान आणला आहे.
ही ठिकाणे हिमाचल प्रदेशमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. CSMT ते हिमाचल प्रदेश प्रवास कसा करायचा हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
तुम्ही रेल्वेने CSMT- दिल्ली - कालका- शिमला किंवा CSMT - चंदीगड - मनाली असा १००० ते १२०० रुपयांमध्ये प्रवास करा.
बजेट हॉटेल्समध्ये रोजचे १ व्यक्तीचे २५० रुपये तर होस्टेल किंवा डॉरम २०० ते ४०० रुपये खर्च होतील.
एक थाळी १०० ते १५० म्हणजेच दिवसाला २५० ते ३०० रुपये असेल.
शिमला फिरण्यासाठी माल रोड, कुफ्री, जाखू मंदिर, स्कॅन्डल पॉईंट, रिज ही ठिकाणे उत्तम आहेत. त्याचा खर्च १०० ते १५० रुपये होईल.
मनाली फिरण्यासाठी हडिंबा मंदिर, सोलांग व्हॅली, मणिकरण, रोहतांग पास (जर उघडे असेल) तर बाईकने ५०० ते ७०० रुपये खर्च होतील.
दलाई लामा मंदिर, भागसू वॉटरफॉल, ट्रेकिंग स्पॉट्स ही ठिकाणे फिरण्यासाठी जास्त खर्च म्हणजे ६ ते ७ हजारांपर्यंत खर्च होऊ शकतो.