Shreya Maskar
पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट पनीर पॉपकॉर्न बनवा.
पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी पनीर, कॉर्न फ्लोर, हळद, लाल तिखट, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, लसूण, मीठ, तेल , ब्रेड क्रम्ब्स इत्यादी साहित्य लागते.
एका बाऊलमध्ये कॉर्न फ्लोर, हळद, लाल तिखट, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, आलं-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ एकत्र करून चांगले मिक्स करा.
या मिश्रणात पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा.
आता या मिश्रणात पनीरचे तुकडे टाकून नीट मिक्स करून घ्या.
आता पिठात घोळवलेले पनीरचे तुकडे ब्रेड क्रम्ब्स मध्ये घोळवा.
सर्व तुकडे एका प्लेटमध्ये ठेवून २० ते २५ मिनिटांसाठी प्लेट फ्रिजमध्ये ठेवा.
एका पॅनमध्ये तेल गरम करून पनीर पॉपकॉर्न खरपूस तळून घ्या.
तळलेले पॉपकॉर्न तेल शोषून घेण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा.
सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत पनीर पॉपकॉर्नचा आस्वाद घ्या.