Siddhi Hande
तुम्ही नेहमीची पावभाजी तर खाल्ली असेल परंतु तुम्ही कधी पनीर पावभाजी खाल्ली आहे का?
पनीर पावभाजीदेखील खूप टेस्टी लागते. पावभाजीची रेसिपी खूप झटपट बनते.
बटाटे, मटार, प्लॉवर, शिमला मिरची, टॉमेटो, कांदा, आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, पनीर, बटर, कोथिंबीर
सर्वात आधी तुम्हाला कुकरमध्ये बटाटे, फ्लॉवर, वाटाणे, टॉमेटो, शिमला मिरची या सर्व भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहे.
कुकरच्या ३-४ शिट्ट्या घ्या. या भाज्या मॅश करा.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात कांदा परता. यात आलं लसूण पेस्ट टाकून परतून घ्या.
यामध्ये पावभाजी मसाला, लाल तिखट टाका. यानंतर मॅश केलेल्या भाज्या टाका. १०-१२ मिनिटे भाज्या छान शिजवून घ्या.
यानंतर शेवटी पनीरचे तुकडे किंवा पनीर किसून टाका. यावर बटर आणि कोथिंबीर टाका.
भाजी २-३ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. तुम्ही पावासोबत भाजी खाऊ शकतात.
Next: उन्हाळ्यात जिरा पाणी रोज सकाळी प्यायल्याने मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे