Paneer Or Tofu: वजन कमी करण्यासाठी पनीर की टोफू, कोणता पर्याय जास्त फायदेशीर?

Dhanshri Shintre

पनीर आणि टोफू

पनीर आणि टोफू हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत, पण वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय अधिक प्रभावी आहे, यावर वेगवेगळे मत आहे.

Paneer Or Tofu | Freepic

आहार पद्धती

पनीर दूध आणि दही मिसळून तयार होते, तर टोफू सोयाबीनपासून बनवला जातो, ज्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या आहार पद्धतींमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवतात.

Paneer Or Tofu | Freepic

दोन्हीची चव

टोफूला पनीरपेक्षा किंचित आंबट चव असते. प्रथिनांसाठी बहुतेक शाकाहारी पनीरला प्राधान्य देतात, तर काहीजण आरोग्यदृष्ट्या फायदेशीर पर्याय म्हणून टोफूची निवड करतात.

Paneer Or Tofu | Freepic

पनीरमध्ये प्रथिने

१०० ग्रॅम पनीरमध्ये त्याच्या प्रकारानुसार १८-२० ग्रॅम प्रथिने असतात, ज्यामुळे ते उच्च प्रथिनयुक्त आहारासाठी लोकप्रिय पर्याय मानले जाते.

Paneer Or Tofu | Freepic

टोफूमध्ये प्रथिने

१०० ग्रॅम टोफूमध्ये ८-१५ ग्रॅम प्रथिने असतात, तर पनीरमध्ये त्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असल्याने पनीर प्रथिनांसाठी अधिक समृद्ध पर्याय ठरतो.

Paneer Or Tofu | Freepic

टोफूमध्ये कॅलरीज

टोफूमध्ये पनीरच्या तुलनेत खूप कमी कॅलरीज असतात. १०० ग्रॅम टोफूमध्ये फक्त ६० कॅलरीज असतात, तर १०० ग्रॅम पनीरसाठी सुमारे ३०० कॅलरीज लागतात.

Paneer Or Tofu | Freepic

चरबी

पनीरमध्ये अधिक प्रमाणात चरबी असते, तर टोफूमध्ये कमी संतृप्त आणि जास्त असंतृप्त चरबी असते, जी हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी अधिक फायदेशीर मानली जाते.

Paneer Or Tofu | Freepic

फायदेशीर आणि आरोग्यदायी

लठ्ठपणा कमी करण्याच्या दृष्टीने, कमी कॅलरीज आणि अधिक असंतृप्त चरबीमुळे पनीरऐवजी टोफू खाणे अधिक फायदेशीर आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो.

Paneer Or Tofu | Freepic

NEXT: संत्र्याच्या सालीचा अनोखा उपयोग, आरोग्यसाठी अन् घरगुती उपायांसाठी देखील फायदेशीर

Orange Peel | Yandex
येथे क्लिक करा