Shreya Maskar
पनीर मलाई कोफ्ता बनवण्यासाठी पनीर, वेलची, साखर, कॉर्न फ्लोअर, बदाम, काजू पेस्ट इत्यादी पदार्थ लागतात.
फ्रेश क्रीम, खवा, हळद, कांदा, बटर, मनुका आणि मैदा हे पदार्थही रेसिपीसाठी लागतात.
पनीर मलाई कोफ्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये, पनीर, वेलची पावडर, कॉर्न फ्लोअर आणि साखर घालून पीठ मळून घ्या.
तयार पिठाचे छोटे कोफ्ते करून तुपात तळून घ्या.
आता दुसऱ्या बाऊलमध्ये पनीर, काजू, हळद आणि बदाम एकत्र करून घ्या.
पॅनमध्ये चिरलेला कांदा गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्या.
आता कढईत तेल टाकून त्यात काजू पेस्ट, कांद्याची पेस्ट, साखर, वेलची पावडर आणि मीठ घालून एक उकळून काढून घ्या.
या मिश्रणात तळलेले कोफ्ते घालून 2-3 मिनिटे उकळा.
पनीर मलाई कोफ्ता फ्रेश क्रीम घालून सजवा.