Shreya Maskar
पनीर चिली बनवण्यासाठी पनीर, शिमला मिरची, कांदा, कॉर्न फ्लोअर, टोमॅटो सॉस, बटर, व्हिनेगर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
आले-लसूण पेस्ट, शेजवान, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मीठ इत्यादी मसाले लागतात.
पनीर चिली बनवण्यासाठी सर्वप्रथम पनीर, कांदा आणि शिमला मिरचीचे तुकडे करून घ्या.
एका बाऊलमध्ये पनीर टाकून त्यात कॉर्न फ्लोअर, मीठ, आले-लसूण पेस्ट, व्हिनेगर आणि मिरचीची पेस्ट टाकून मॅरीनेट करा.
आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे गोल्डन फ्राय करा.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल घालून त्यात आले-लसूण पेस्ट आणि चिरलेली हिरवी मिरची घालून भाजून घ्या.
त्यानंतर त्यात चिरलेली शिमला मिरची, कांदा टाकून मिक्स करा.
शेवटी शेजवान सॉस, टोमॅटो सॉस, ग्रिन चिली सॉस, सोया सॉस , बटर आणि पनीर घालून एकजीव करून घ्या.