Shreya Maskar
मेथीचे थालीपीठ बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, बेसन, दही, कांदा, तीळ, कोथिंबीर, मेथीची पाने इत्यादी साहित्य लागते.
मेथीचे थालीपीठ बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, हळद, लाल तिखट, धणे- जिरेपूड, ओवा आणि मीठ इत्यादी मसाले लागतात.
मेथीचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथीची पानं स्वच्छ धुवून चिरून घ्या.
त्यानंतर एका बाऊलमध्ये गहू, तांदूळ , ज्वारी आणि बाजरीचे पीठ मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात सर्व मसाले टाका आणि मिश्रण एकजीव करा.
थालीपीठचे पीठ छान मळता यावे म्हणून त्यात दही टाका.
शेवटी या मिश्रणात बेसन, कांदा, तीळ, कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
आता या मिश्रणाचे सुती कपडावर थालीपीठ थापून तेलात खरपूस भाजून घ्या.