Shreya Maskar
ब्रोकोली पराठा बनवण्यासाठी नाचणीचे पीठ, ब्रोकोली, चीज, मीठ, तेल, कांदा, पांढरे तीळ आणि कोमट पाणी इत्यादी साहित्य लागते.
ब्रोकोली पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम नाचणीचे पीठ गरम पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्या.
पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरे, चिरलेला कांदा घालून मिक्स करा.
कांदा गोल्डन फ्राय झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली ब्रोकोली, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि पांढरे तीळ टाकून छान मिक्स करा.
भाजी शिजल्यावर चांगली मॅश करा.
नाचणीच्या पिठाचे छोटे गोळे करून त्यात ब्रोकोलीचे सारण आणि चीज टाका.
आता गोलाकार छान पराठा लाटून घ्या.
पॅनमध्ये तूप गरम करून दोन्ही बाजूंनी पराठा भाजून घ्या.
पुदिन्याच्या चटणीसोबत ब्रोकोली पराठाचा आस्वाद घ्या.