Shreya Maskar
उन्हाळ्यात आवर्जून काजूची चटणी बनवा.
काजूची चटणी बनवण्यासाठी काजू, चणा डाळ, उडीद डाळ, आलं , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, तेल आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
काजूची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून आलं, हिरवी मिरची, चणा डाळ आणि उडीद डाळ टाकून परतून घ्या.
दुसऱ्या पॅनमध्ये तेलात काजू गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या.
यात कढीपत्ता टाकून गॅस बंद करा.
आता काजू आणि डाळ मिक्सरला छान वाटून घ्या.
या मिश्रणात शेवटी लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाका.
गरमागरम भात किंवा चपातीसोबत काजूच्या चटणीचा आस्वाद घ्या.