Shruti Vilas Kadam
भिजवलेली मूग डाळ, किसलेले पनीर, हिरवी मिरची, आले, मीठ, हळद, कोथिंबीर आणि थोडं तेल.
मूग डाळ ३-४ तास भिजवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात थोडं पाणी घालून स्मूथ बॅटर तयार करा.
तयार बॅटरमध्ये किसलेले पनीर, मिरची-आले पेस्ट, मीठ, हळद आणि कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करा.
तवा गरम करून त्यावर थोडं तेल लावा. नंतर एक डाव बॅटर टाकून पातळ पसरवा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा. गरज असल्यास थोडं तेल सोडा.
गरमागरम चीला हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
ही रेसिपी प्रोटीनने भरपूर असून वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी डाएटसाठी उत्तम पर्याय आहे. पचायला हलकी आणि चविष्ट आहे.