Siddhi Hande
पंढरपुरच्या वारीत रोज वेगवेगळे जेवण बनवले जाते. वारकरी मिळून हे जेवण बनवतात.
या वारीत हमखास बाजार आमटी बनवली जाते.
बाजार आमटी ही सोलापूर जिल्ह्यातील करकंब गावात फार पूर्वीपासून बनवली जायची.
बाजार आमटी बनवण्यासाठी विविध डाळी म्हणजे तूर, मसूर, मूग या डाळी शिजवून घेतल्या जातात.
त्यानंतर कढईत तेल तापवले जाते. त्यात जिरं, कढीपत्ता, मोहरी आणि घरचे मसाले टाकतात.
यानंतर त्यात सोलापूरी काळे तिखट मिसळले जाते. त्यानंतर छान परतून घेतात.
यानंतर मसाल्यात डाळी आणि पाणी टाकतात. आमटीला छान उकळून घेतात.
ही आमटी पंढरपूरमध्येही फेमस आहे. अनेकजण ही आमटी बनवतात. ही आमटी खूप पौष्टिक आणि चविष्ट असते.