Hill Station : मुंबई-पुण्यापासून जवळच आहे 'हे' सुंदर हिल स्टेशन, आताच प्लान करा दिवाळी व्हेकेशन

Shreya Maskar

सातारा

पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात वसलेले आहे. हिवाळ्यात येथे थंडगार हवा पाहायला मिळते. वीकेंडला नक्की ट्रिप प्लान करा.

Satara | google

पाचगणी हिल स्टेशन

हिरव्यागार डोंगररांगा, खोल दऱ्या, आल्हाददायक हवामान आणि विस्तीर्ण पठार यांमुळे पाचगणी पर्यटकांच्या पसंतीस उतरते.

Panchgani Hill Station | google

उंची किती

पाचगणी हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून सुमारे १,३३४ मीटर उंचीवर आहे. तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येथे भन्नाट फोटोशूट करू शकता. पाचगणीला फिरण्यासाठी सुंदर ठिकाणांची यादी नोट करा.

What is the height? | google

टेबल लँड

टेबल लँड हे पाचगणीचे सर्वात प्रसिद्ध आकर्षण आहे. विस्तीर्ण सपाट खडकाळ पठारावरून आजूबाजूच्या डोंगररांगा आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य दिसते. येथे चालणे, घोडेस्वारी आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी येथील दृश्य विशेष सुंदर दिसते.

Table Land | google

पारसी पॉइंट

पारसी पॉइंट हे कृष्णा नदीच्या खोऱ्याचे आणि धोम धरणाच्या जलाशयाचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. थंड वारा, हिरव्यागार दऱ्या आणि शांत वातावरण यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Parsi Point | google

मॅप्रो गार्डन

पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील मॅप्रो गार्डन हे स्ट्रॉबेरीपासून तयार केलेले पदार्थ, आइस्क्रीम, मिल्कशेक, जॅम आणि चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहे.

Maprow Garden | google

कधी-कसं जावं?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाचगणी हिल स्टेशन नक्की भेट द्या. पाचगणीसाठी वाठार हे जवळचे रेल्वे स्थानक आहे; मात्र गाड्यांच्या उपलब्धतेनुसार सातारा किंवा पुणे मार्गाचाही विचार करता येतो. पुढील प्रवासासाठी बस किंवा टॅक्सी घ्यावी लागेल.

How about going? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : थंडगार वारा अन् अथांग समुद्रकिनारा, मुंबईच्या गर्दीत लपलेला 'हा' बीच ९९% लोकांना माहितच नसेल, वीकेंड करा प्लान

Mumbai Beach | AI PHOTO
येथे क्लिक करा...