Shreya Maskar
नैवेद्याचे पंचामृत उरले असेल तर गोड आणि मऊ केक झटपट बनवा.
पंचामृत केक बनवण्यासाठी दही, दूध, साजूक तूप, मध, साखर, वेलची पावडर , रवा, बेकिंग पावडर आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
पंचामृत केक बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये दही, दूध, साजूक तूप, मध, साखर घालून पंचामृत तयार करून घ्या.
तयार पंचामृतामध्ये रवा, बेकिंग पावडर घालून चांगले ढवळून घ्यावे.
आता सारण केक ट्रेमध्ये ओतून घ्या.
यात वरून तुमच्या आवडीनुसार कापलेले ड्रायफ्रूट्स घाला.
मायक्रोवेव्हमध्ये केके ३० ते ३५ मिनिटे बेक करा.
प्रेशर कुकरमध्ये केक शिजवताना मंद आचेवर ३५ ते ४० मिनिटे बेक करावा.