Shreya Maskar
फरसबीची भाजी बनवण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, दाण्याचा कूट, लिंबाचा रस, किसलेले खोबरे, मीठ आणि साखर इत्यादी साहित्य लागते.
फरसबीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजी बारीक कापून घ्या.
गरम पाण्यात चवीनुसार मीठ घालून त्यात फरसबी हलकी उकडून घ्या.
हिरवी मिरची आणि मीठ खलबत्त्यात जाडसर वाटून घ्या.
एका बाऊलमध्ये फरसबी, हिरवी मिरची पेस्ट, किसलेले खोबरे, दाण्याचा कूट, साखर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या.
आता पॅनमध्ये तेल, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून फोडणी तयार करून घ्या.
शेवटी भाजीवर फोडणी टाकून कोथिंबीर भुरभुरून घ्या.
गरमागरम चपातीसोबत फरसबीच्या भाजीचा आस्वाद घ्या.