Shreya Maskar
पणजी हे गोवा राज्याची राजधानी आहे आणि ते मांडवी नदीच्या काठावर वसलेले एक सुंदर शहर आहे.
पणजीला गेल्यावर संस्कृती, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम पाहायला मिळतो. येथे भव्य चर्च, पक्षी निरीक्षणासाठी अभयारण्य, सुंदर किनारे पाहायला मिळतात.
पणजी हे भारतातील कॅसिनोचे केंद्र म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात येथील सौंदर्य खुलून येते. प्रत्येक ठिकाण फोटोशूटसाठी बेस्ट आहे.
पणजीला गेल्यावर टेरेस्ड टेकड्या, बाल्कनीसह काँक्रीटच्या इमारती आणि टाईल्सची छत पाहायला मिळतात.
पणजी येथे नारळाच्या झाडांनी वेढलेला मीरामार बीच आहे. तसेच सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. पक्षीप्रेमींनी येथे नक्की भेट द्या.
येथे 17 व्या शतकात बांधलेला अगुआडा किल्ला आहे. तसेच मांडवी नदीच्या काठावर रेईस मागोस किल्ला वसलेला आहे.
पणजीला गेल्यावर जुना गोवा पाहायला मिळतो. फॅमिलीसोबत ट्रिपसाठी हे सुंदर लोकेशन आहे. त्यामुळे सुट्टीत येथे प्लान करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.