Shreya Maskar
उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत गोव्याला ट्रिप प्लान करा. गोव्यात पालोलेम बीच नावाचे एक सुंदर ठिकाण आहे. येथे नक्की फिरायला जा.
दक्षिण गोव्यातील पालोलेम बीच हे एक सुंदर, अर्धचंद्राकृती किनारा आहे. येथे शांत खळखळणारे पाणी, नारळाची झाडे पाहायला मिळतात.
पालोलेम बीचवर तुम्हाला साइलेंट डिस्कोसोबत भन्नाट नाइटलाइफचा आनंद घेता येईल. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
पालोलेम बीचवर पोहण्याचा, कयाकिंगचा अनुभव घेता येतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.
पालोलेम बीच जवळ अगोंडा बीच, पाटणेम बीच, कानाकोना बेट, कोला बीच, बटरफ्लाय बीच वसलेला आहे. तसेच जवळच कोटिगाव वन्यजीव अभयारण्य देखील आहे.
येथे गेल्यावर सुंदर डॉल्फिन पाहायला मिळतात. तसेच बीच जवळ काबो दे रामा किल्ला देखील आहे. पालोलेम बीच पामच्या झाडांनी वेढलेला आहे.
पालोलेम बीचला गेल्यावर सी-फूडचा आनंद घ्या. येथे अनेक प्रसिद्ध रेस्टॉरंट्स आहेत. उत्तम चवीचे सी-फूड तुम्हाला येथे खायला मिळेल.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.