Shreya Maskar
ढाकोबा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात, माळशेज घाट आणि नाणेघाटाच्या सानिध्यात वसलेला आहे.
ढाकोबा किल्ला ज्याला उंच शिखर किंवा टेहळणी बुरूज मानले जाते. ज्याची उंच ३,९०० ते ४,०५१ फूट आहे.
ढाकोबा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने आंबोली गावाचा मार्ग किंवा नाणेघाट/भीमाशंकर रांगेच्या परिसरातून ट्रेकिंग करून जावे लागते.
ढाकोबा किल्ल्यावरून दर्या घाट, जीवधन किल्ला आणि कोकण प्रदेशाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
ढाकोबा किल्ल्यापर्यंत तुम्ही घनदाट जंगलातून ट्रेकिंग करून पोहचला. येथे ट्रेकिंगचा थरारक अनुभव येतो.
ढाकोबा किल्ल्यावरील तीन उंच गुंफा, दर्या घाटाचे विहंगम दृश्य आणि जवळच असलेले एक मंदिर ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
ढाकोबा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरातील 'दुर्ग' (Durg) या जुळ्या किल्ल्यासोबत जोडीने ओळखला जातो.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.