Shreya Maskar
उकडहंडी बनवण्यासाठी वांगी, कोनफळ, रताळे, बटाटा, वाल पापडी, घेवडा, शेवग्याच्या शेंगा, गाजर, कांदा, पातीचा कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, तीळ, गूळ, ओलं खोबरं, तेल आणि मटार इत्यादी साहित्य लागते.
लाल तिखट, गरम मसाला, हिंग, हळद, मीठ, कोथिंबीर, आले- लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची इत्यादी मसाले लागतात.
उकडहंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्या.
आता एक मातीचे मोठे भांडे घेऊन त्यात चिरलेल्या सर्व भाज्या टाका.
या मिश्रणात चवीनुसार मीठ, हळद आणि सर्व मसाले टाकून मिक्स करा.
मिश्रणात वरून तेल टाकायला विसरू नका.
सर्व मिश्रण मिक्स करून त्यात तीळ, ओल खोबरं, गूळ घालून परतून घ्या.
चुलीवर ही भाजी १५-२० मिनिटे शिजवून त्यावर कोथिंबीर भुरभुरवा.
उकडहंडी वाफेवर शिजते त्यामुळे पाणी अजिबात टाकू नये.