Shreya Maskar
जांभुळाचे शॉट्स बनवण्यासाठी जांभूळ, काळे मीठ, साखर, पुदिन्याची पाने, बर्फाचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.
जांभुळाचे शॉट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम जांभळ स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर जांभळातील बी काढून घ्या.
आता मिक्सरला जांभुळांचा गर, साखर, काळे मीठ, पुदिन्याची पाने टाकून पेस्ट करा.
या मिश्रणात आता बर्फाचे तुकडे टाकून ज्यूस बनवा.
एका काचेच्या ग्लासच्या कडेला लिंबू आणि मीठ लावून घ्या.
या ग्लासमध्ये आता जांभुळांचा रस ओता.
जांभुळाचे शॉट्सच्या सजावटीसाठी वरून पुदिन्याची पाने टाका.