Shreya Maskar
दुधी भोपळ्याचे धपाटे बनवण्यासाठी दुधी भोपळा, गव्हाचे पीठ, बेसन पीठ, ज्वारीचे पीठ, जिरे, तीळ ,ओवा, तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर आणि लसूण पेस्ट इत्यादी साहित्य लागते.
दुधी भोपळ्याचे धपाटे बनवण्यासाठी दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून साल काढून किसून घ्या.
किसलेला भोपळा बाऊलमध्ये काढून यात तिखट ,मीठ, हळद ,जिर, तीळ घालावे.
आता यात गहू, बेसन, ज्वारीचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
पाण्याचा वापर न करता धपाट्यांचे पीठ मळून घ्या.
आता ओल्या कपड्यावर धपाटे हळुवार थापून घ्या.
पॅनमध्ये तेल टाकून धपाटे खरपूस भाजून घ्या.
दही किंवा चटणीसोबत दुधी भोपळ्याचे धपाट्यांचा आस्वाद घ्या.