Palghar Tourism : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय; तर पावसाळ्यात पालघरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या

Shruti Vilas Kadam

पावसाळा सुरू झाला की निसर्गप्रेमींची पाऊले वळतात, डोंगररांगाकडे, धबधबे तसेच गडकिल्ल्यांकडे सुदैवाने मुंबई नजीकच्या पालघरमध्ये अशी ठिकाणे उपलब्ध आहेत.

Palghar places to visit in monsoon | saam tv marathi

दाभोसा धबधबा

जव्हार या ठिकाणी असलेला ३०० फूट उंचीवरून कोसळणारा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि नयनरम्य धबधब्यांपैकी एक आहे, ट्रेकर्ससाठी हा आकर्षणाचा साहसी धबधबा असून पालघर रेल्वे स्थानकापासून फक्त ८० किमी अंतरावर आहे.

dabhosa waterfall | google

पिलुचा आणि हिराडपाडा धबधबे (विक्रमगड/जव्हार)

मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन्ही स्वरूपाचा धबधबा आहे. धरणाचे पाणी जेव्हा ओव्हरफ्लो होते आणि कड्यावरून ३०० फूट खाली लेंडी नदीच्या पात्रात कोसळते आणि हा धबधबा तयार होतो. धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता साहसी जंगलातून जाणारा आहे, ज्यामुळे ट्रेकर्सना हा मार्ग खूप आवडतो.

PILUCHA WATERFALL | Google

केळवे फोर्ट

पालघर समु्द्रकिनाऱ्यालगत असणारा ऐतिहासिक किल्ला पावसाळ्यात शांत सुंदर असतो. बुरूजावरून दिसणारा खवळेला समुद्र पाहण्यात पर्यटकांना आनंद मिळतो.

kelve fort | google

केळवे बीच

हा पालघरमधील सर्वात मोठा समुद्रकिनारा असून समुद्राच्या मोठ्या लाटा, किनाऱ्यावरील केळवे किल्ला, पाण्याचे तळे पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

kelve beach | google

कालमांडवी धबधबा

जव्हार या ठिकाणापासून सुमारे ८ किमी अंतरावर असलेला हा धबधबा १०० मी खोल आणि पायऱ्यांप्रमाणे कोसळणारा धबधबा आहे. हा धबधबा निसर्गाची अद्भुत कलाकृती आहे. रॉक क्लाइंबिक तसेच रॅपेलिंगसाठी हा धबधबा प्रसिद्ध आहे

kalmandvi waterfall | sgoogle

देवखोप तलाव

पालघर स्थालकापासून जवळ असलेले एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. आजूबांजूना असलेले हिरवे डोंगर आणि हा तलाव फोटोशूटसाठी उत्तम ठिकाण आहे.

devkhop pond | google

वाघोबा धबधबा

मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटात हा धबधबा असून पालघर रेल्वे स्थानकापासून अवघ्या ७ किमी अंतरावर आहे.

waghoba waterfall | google

आशेरीगड

मुंबई - अहमदाबाद हायवेवर असणारा आशेरीगड हा ट्रेकर्ससाठी पावसाळ्यात पर्वणी आहे. गड सर करताना लागणारी धुक्याची चादर, आणि पाण्याचे छोटे मोठे झरे ट्रेकर्सचा उत्साह वाढवतात .

aasherigad | google

Prajakta Mali Farmhouse : निर्सगाच्या सान्निध्यातील प्राजक्ता माळीच आलिशान फार्महाऊस जाणून घ्या एका दिवसाच भाडं

Prajakta Mali Farmhouse | Saam Tv
येथे क्लिक करा